पाचोरा तालुक्यातील लासुरे येथील जवानाचा कर्तव्यावर असताना आकस्मिक मृत्यू झाल्याची अत्यंत दुःखद घटना आज, सोमवार दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी घडली. पाचोरा तालुक्यातील लासुरे येथील रहिवासी मन्साराम झिपरू देवरे यांचे सुपुत्र व वाल्मिक मन्साराम देवरे यांचे बंधू CRPF मध्ये कार्यरत असलेले सैनिक शालिक (नानाभाऊ) मन्साराम देवरे यांचे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने देवरे कुटुंबावर तसेच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.