पाचोरा: आमदारांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक 8 मध्ये शिवसेना शिंदे गटांच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात आला,
पाचोरा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून प्रभाग क्रमांक ८ मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार एरंडे मीनाक्षी संजय व गणेश भीमराव पाटील यांनी आज आपल्या प्रचार मोहिमेला सुरवात केली पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील गाडगेबाबा नगरच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळील महादेव मंदिरातकार्यकर्ते आणि समर्थकांच्या उपस्थितीत प्रचार नारळ वाढवून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला,