दारव्हा शहरातील दुर्गा चौक परिसरात राहणाऱ्या प्रज्वल विठ्ठल चिरडे (वय 25) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 10 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता दरम्यान उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.नेमके आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही