कळमनूरी: आखाडा बाळापूर शिवारात वीस वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
कळमनुरी तालुक्यातील साळवा येथील रहिवासी असलेला तरुण विजय गजानन कदम वय 20 वर्ष या तरुणाचा मृतदेह आ .बाळापुर शिवारात बायपास रस्त्याच्या बाजूला शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दि .25 मे रोजी दुपारी आढळून आला आहे .या प्रकरणी आ.बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेहावर तेथील ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाली आहे .