घाटंजी: साखरा येथे घरफोडी करून अज्ञाताने लंपास केले 68 हजार रुपये,घाटंजी पोलिसात गुन्हा दाखल
फिर्यादी अरविंद जाधव यांच्या तक्रारीनुसार 16 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबरच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घराच्या दरवाजाचे कुलूपकोंडा तोडून घरामध्ये प्रवेश करून लाकडी अलमारी मध्ये ठेवलेले 68 हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी 17 नोव्हेंबरला सायंकाळी अंदाजे चार वाजताच्या सुमारास घाटंजी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.