तालुक्यातील बिजासन घाटात महाराष्ट्र पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर आरजे 14 जीएच 0835 क्रमांकाचे अपघातग्रस्त कंटेनर वाहनाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दोन मोटरसायकलींसह सुमारे 1 लाख 64 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.