यवतमाळ: आदिवासी कोलाम समाज बांधवांचा यवतमाळ नगर परिषदेसाठी काँग्रेसला एकमुखी पाठिंबा
यवतमाळ येथील माऊली मंगल कार्यालय येथे आदिवासी कोलाम समाज बांधवांची एक महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक सभा पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी श्री. लक्ष्मण भिवणकर होते,तर माजी मंत्री अँड. शिवाजीराव मोघे साहेब यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी सर्व कोलाम समाज बांधवांनी येणाऱ्या यवतमाळ नगर परिषद निवडणुकीसाठी प्रा. प्रियंकाताई जितेंद्र मोघे (नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार) आणि काँग्रेस व मित्र पक्षाच्या सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना एकमताने निवडून आणण्याचा निर्धार केला.