शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत पवनी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. सौ. विजया ठाकरे नंदुरकर यांनी आज स्थानिक चिकन व मटण मार्केट परिसराची सविस्तर पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी मार्केटमधील स्वच्छतेचा दर्जा, सांडपाण्याची विल्हेवाट आणि विक्रेत्यांकडून पाळले जाणारे नियम यांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. पावसाळी वातावरणात तसेच वाढत्या गर्दीच्या काळात परिसरात दुर्गंधी पसरू नये आणि ग्राहकांना आरोग्यदायी वातावरणात खरेदी करता यावी, यासाठी त्यांनी संबंधित विभागाला आवश्यक सूचना द