सासरी पाहुणचाराला आलेल्या जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. १२ डिसेंबर) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मौजा सुरगाव शिवारात उघडकीस आली. उमेश घनश्याम मोहिजे (वय ४०, रा. अडेगाव, ता. कळमेश्वर, जि. नागपूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अशी माहिती ता. १३ ला सेलू पोलिसांकडून देण्यात आली.