ग्रामीण भागात असलेल्या कीन्ही शेतशिवारात वाघाने 2 जनावरांची शिकार केल्याची घटना घटना घडली. याबाबत चे वृत्त असे की शेतकरी रामभाऊ निंबरते यांनी आपली जनावरे शेतावर बांधून ठेवले होते. सकाळी 8 वाजताच्या सुमारास शेतावर गेले असता 1 बैल व 1 गोरा ची वाघाने शिकार केल्याचे दिसून आले. त्यावरून घटनेची माहिती वनविभाग व पोलीस स्टेशन ला देण्यात आली. त्यावरून वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा करण्यात आला.