यवतमाळ शहरात जिजाऊ जन्मोत्सव–२०२६ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सकाळी जिजाऊ वंदनेने उत्सवाची सुरुवात,रांगोळी व चित्रकला स्पर्धा,सायंकाळी ढोल पथकाद्वारे मानवंदना व बक्षीस वितरण सोहळा ‘शिवतीर्थ’,गार्डन रोड,यवतमाळ येथे संपन्न होणार आहे.नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.