श्रीगोंदा सह कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा; रब्बी हंगामासाठी कुकडी प्रकल्पाचे आवर्तन सुरू रब्बी हंगामातील पिकांसाठी वाढती पाण्याची मागणी लक्षात घेता, राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कुकडी प्रकल्पाचे आवर्तन सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार २६ डिसेंबरपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून, जलसंपदा विभागाने पुढील ४० दिवसांचे नियोजन निश्चित केले आहे. नगरपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कालवा सल्लागार समितीची बैठक होऊ शकली नव्हती.