आज दिनांक 21 डिसेंबर रोजी आर्णी तहसील कार्यालयात आर्णी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या मतमोजणीमध्ये आर्णी शहरातून काँग्रेसचे नालंदा भरणे यांनी 1267 मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवत शिवसेनेचे उमेदवार कुणाल मनवर यांचा पराभव केला आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या नालंदा भरणे यांना 4646 मते मिळाली, तर शिवसेनेचे कुणाल मनवर यांना 3379 मते प्राप्त झाली. तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे राजू वाडेकर हे 3333 मतांसह राहिले, तर चौथ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्ट