औसा: आदिवासी वाडी,वस्त्यांवर सेवा देणारेशिक्षक,पोलीस पाटील व ‘उमेद’ कर्मचारी आंदोलनात; सरकारने तातडीने संवाद साधावा,आ.पवार
औसा -आदिवासी वाडी-वस्त्यांवर जाऊन विद्यादानाचे कार्य करणारे शिक्षक, स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधणारे पोलीस पाटील, तसेच ‘उमेद’ अभियानांतर्गत कार्यरत असलेले कंत्राटी अधिकारी व कर्मचारी हे आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाला बसले आहेत.या कर्मचाऱ्यांनी अनेक दिवसांपासून शासनाच्या दारात पाठपुरावा करूनही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप औसा येथील आमदार अभिमन्यू पवार यांनी आज हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला आहे.