आज दिनांक 14 जानेवारी सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजीनगर एमआयएम पक्षाचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आज शहरात पतंग उडवत अनोख्या पद्धतीने निवडणूक आयोगावर टीका केली. निवडणूक आयोग हा स्वतंत्र न राहता भारतीय जनता पार्टीची “कटपुतळी” बनला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. निवडणूक प्रक्रियेत पक्षपातीपणा होत असून लोकशाहीच्या मूल्यांना तडा जात असल्याचे जलील यांनी म्हटले. निवडणूक आयोगाने निष्पक्ष भूमिका घ्यावी, अन्यथा जनता रस्त्यावर उतरून जाब विचारेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.