साकोली सेंदूरवाफा नगरपरिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी साकोली तहसील कार्यालयात रविवार दि.21 डिसेंबरला सकाळी दहा पासून होणार आहे.यासाठी सहा टेबलची व्यवस्था करण्यात आली असून एकूण पाच फेऱ्या होणार आहेत ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी निलेश कदम यांनी शनिवार दि.20 डिसेंबरला दुपारी तीन वाजता दिली आहे 2 डिसेंबरला निवडणूक झाली होती न्यायालयाच्या निकालाप्रमाणे उद्या मतमोजणी होणार आहे