पुण्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात काँग्रेसची ताकद मानले जाणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते मुख्तार शेख यांनी आपला मुलगा विकार शेख यांच्यासह काँग्रेसला 'रामराम' ठोकला आहे. या पिता-पुत्रांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.