मस्सजोग येथे शनिवार दि. 13 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत देशमुख कुटुंबाच्या वकिलांनी वाल्मिक कराड हाच मुख्य आरोपी असल्याची भूमिका मांडली.तसेच या हत्या प्रकरणाशी संबंधित तब्बल 23 व्हिडीओ पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली. आरोपीचे समर्थन करणारी टोळी सध्या सक्रिय झाली असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी त्यांन