मोताळा: शेंबा येथे रिवाईंडिंगच्या दुकानात सायरन वाजला, चोरटे पळाले
शेंबा येथील एका रिवाईडिंग दुकानाचे शटर वाकवून चोरी करण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला; मात्र दुकानातील सुरक्षा कॅमेऱ्याचा सायरन वाजताच चोरट्यांनी घाबरून पळ काढल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी घडली आहे.याप्रकरणी ज्ञानेश्वर पंढरी व्यवहारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध बोराखेडी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याची माहिती २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता पोलिस सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.