वाघाने भरवस्तीत येऊन केली हरणाची शिकार साकोली तालुक्यातील उमरी येथे भरवस्तीत असलेल्या पगाजी शेंद्रे यांच्या घराजवळ वाघाने सोमवार दिनांक 2 फेब्रुवारीला पहाटे सहा वाजता हरणाची शिकार केली. वनविभागाने घटनास्थळी भेट घेतली आहे. भरवस्तीत वाघाने येऊन शीकार केल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे