खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा येथे किरकोळ वादातून एका तरुणावर चाकूने भोसकून प्राणघातक हल्ला झाला होता. या घटनेत राजमहम्मद रफिक शेख (३२) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर घाटी रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. मात्र या गंभीर प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक न झाल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. मंगळवारी कसाबखेडा येथील ग्रामस्थांनी खुलताबाद पोलिस ठाणे येथे गर्दी करत निषेध नोंदवला. जखमी मृत्यूशी झुंज देत असताना आरोपी मोकाट फिरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला