शासनाने बंदी घातलेल्या नायलॉन मांजाची विक्री केल्याप्रकरणी भुसावळ शहरातील श्रीराम नगर परिसरात पोलिसांनी छापा टाकून एका इसमास अटक केली. ही कारवाई १० जानेवारी २०२६ रोजी दुपारी साडेतीन ते साडेचारच्या सुमारास करण्यात आली. स्थानीय गुन्हे शाखा, जळगाव येथे कार्यरत पोलीस कर्मचारी राहुल वानखेडे यांच्या फिर्यादीनुसार, गुप्त बातमीदारामार्फत भुसावळ शहरातील श्रीराम नगर भागात नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनामिळाली.त्यानुसार कारवाई करण्यात आली