पाचोरा: पाचोरा तहसील कार्यालयात निर्मल इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांची भेट, जाणुन घेतली महसुल विभागाची माहिती
पाचोरा तहसील कार्यालयात आज १ आॅगस्ट २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता महसूल दिनानिमित्त येथील भडगाव रोडवरील निर्मल इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी भेट घेवुन तहसील कार्यालयात चालणाऱ्या दैनंदिन कामकाजा विषयी माहिती जाणुन घेतली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना निवासी नायब तहसीलदार विनोद कुमावत, नायब तहसीलदार प्रमोद मोरे यांनी समर्पक उत्तरे दिली.