पारोळा: पिकांवर फवारणी करताना विषबाधा, शेतकऱ्याचा मृत्यू तालुक्यातील भोकरबारी गावातील घटना
Parola, Jalgaon | Oct 25, 2025 पिकांवर फवारणी करीत असताना त्याचा नाका तोंडात विषारी औषध गेल्याने तालुक्यातील भोकरबारी येथील तरुण शेतकऱ्याला विषबाधा झाली होती. तीन दिवसाच्या उपचारादरम्यान त्याचा समाधान पाटील शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला. समाधान रमेश पाटील (वय ३३) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.