शिरूर कासार: आमदार सुरेश धस यांच्या स्वीय सहाय्यकाची वादग्रस्त कॉल रेकॉर्डिंग वायरल, एका व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी
सध्या आष्टी आणि सुरेश धस हे नाव नेहमीच चर्चेत असलेलं पाहायला मिळत याआधी अनेक घसांच्या कार्यकर्त्यांमुळे सुरेश धस हे अडचणीत आलेले पाहायला मिळाले मात्र पुन्हा एकदा शिरूर येथील त्यांचे स्वीय सहाय्यक आसाराम माने यांनी एका व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी दिली आहे यात फिर्यादी संतोष धोंडीराम गायके या व्यक्तीने माने यांच्या पुतण्याला दीड लाख रुपये दिले मात्र काही केल्या मानेंचा पुतण्या चार वर्षांपासून हे पैसे देत नव्हता त्याला गायके यांनी पैसे कधी देणार असं विचारल्यानंतर हा वाद झाला.