शहराच्या विकासासाठी लोकसेवा आघाडीच्या ४ उमेदवारांना व १ अपक्ष उमेदवारालाही जर आमचा पाठिंबा हवा असेल तर कोपरगाव शहराच्या विकासासाठी आमचा त्यांना बिनशर्त पाठींबा राहील. विकास कामे कोर्टात नेवून नागरीकांना झुलवत ठेवण्याचे काम यापूर्वी झाले आहे. त्यामुळे कोपरगाव नगरपरिषदेत समतोल ठेवण्यासाठी त्यांच्या निर्णयांना पाठींबा देवून शहराच्या विकासासाठी उपनगराध्यक्ष व समित्यांचे सभापतीपदही देणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी आज २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वा. पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.