वर्धा: स्थापना दिन सोहळा:लोककलेचा महाकुंभ!भांगडा, लावणी,भरतनाट्यमचा अविष्कार;हिंदी विश्वविद्यालयात सांस्कृतिक उत्सवाची धमाल
वर्ध्याच्याआंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाने आपला २९वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्त आयोजित 'सांस्कृतिक संध्या' कार्यक्रमाने संपूर्ण परिसर भारतीय लोकसंस्कृतीच्या रंगात न्हाऊन निघाला.विश्वविद्यालयाच्या 'वाचस्पती भवन' प्रांगणात एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात 'वंदे मातरम्' आणि सरस्वती वंदनेने झाली. यावेळी कुलगुरू प्रो. कुमुद शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते असे आज 9जानेवारी रोजी रात्री 9 वाजता प्रसिद्धीस दिले