भंडारा: रस्त्यावर वाघाची दबंग एन्ट्री! किटाडी–मासळ मार्ग ठप्प; व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ <nis:link nis:type=tag nis:id=viral nis:value=viral nis:enabled=true nis:link/>
किटाडी ते मासळ या मार्गावर सायंकाळी अचानक पट्टेदार वाघ रस्त्यावर उतरल्याने नागरिकांचा आणि वाहनचालकांचा काही काळ मार्ग पूर्णतः बंद झाला. गुरुवारी २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास हा रोमांचक आणि थरारक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. वाहन चालकांनी रस्ता ओलांडण्यापूर्वीच वाघ समोर दिसताच आपली वाहने तत्काळ थांबवली. दरम्यान, वाघाने शांतपणे रस्ता ओलांडताना अनेकांनी हा प्रसंग मोबाईलमध्ये कैद केला.