*महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर* *स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी ; जानेवारी ते डिसेंबर २०२६ पर्यंत विविध परीक्षांचे नियोजन* महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) सन २०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. आयोगाने प्रशासकीय सेवेतील महत्त्वाच्या परीक्षांसह गट-ब आणि गट-क सेवा परीक्षांचे सुध्दा अंदाजित वेळापत्रक जाहीर केले आहे.