गोंदिया: निंबा -युवा मित्र नाट्य मंडळ निंबा यांच्या सौजन्याने 'बदला' नाटकाचे भव्य आयोजन
Gondiya, Gondia | Nov 30, 2025 निंबा -युवा मित्र नाट्य मंडळ निंबा यांच्या सौजन्याने व माऊली नाट्य रंगभूमी वडसा प्रस्तुत तीन अंकी नाटक "बदला "याचे भव्य सादरीकरण दि.30 नोव्हें रोज रविवारला बस स्टॉप चौक निंबा येथे करण्यात आले. सामाजिक असे थरारक, कथानक ,आणि प्रभावी अभिनय यांचा संगम असलेले हे नाटक गावातील व परिसरातील नागरिकांसाठी खास मंडई निमित्त आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजनामध्ये युवा नाट्य मंडळ निंबा याचे विशेष योगदान असून गावच्या सांस्कृतिक जाणीवा वाढवण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.