'रोटरी क्लब अहमदपूर'तर्फे पोलीस बांधवांसाठी मोफत 'आरोग्य शिबिर'; ६० कर्मचाऱ्यांची तपासणी! शहरात रोटरी क्लब अहमदपूर आणि पोलीस स्टेशन अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने उपविभागीय कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या पोलीस बांधवांसाठी एका महत्त्वाच्या आणि सर्वसमावेशक मोफत वैद्यकीय तपासणी, रक्ततपासणी व वैद्यकीय सल्ला शिबिराचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले. शहरातील नामवंत आणि तज्ञ डॉक्टरांनी या शिबिरात निःशुल्क सेवा दिली. तणावाखालील कामासाठी आरोग्य