नांदुरा: अवधा बु येथे २३ वर्षीय युवकाची गळफास घेवून आत्महत्या
नांदुरा तालुक्यातील रामपूर (ह.मु. अवधा बु.) येथील रहिवासी करण संजय तेलंग (२३) या तरूणाची मानसिक स्थिती ठिक नसल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू होता. तर घराच्या बाजूला असलेल्या चिंचेच्या झाडाला साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आज २४ नोव्हेंबर २५ रोजी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास आढळून आला. त्याच्या मृत्यूविषयी कोणावरही काही संशय नसल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी संजय गणपत तेलंग यांनी नांदुरा पोस्टेला दिलेल्या फिर्यादीवरून कलम १९४ भान्यासुसं नुसार मर्ग दाखल केला आहे.