भुसावळ येथे नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक 17 अ, वार्ड क्रमांक 17 ब निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप उमेदवारांकडून करण्यात येत आहे. मतदार यादीत बोगस नावे, डबल नोंदी, मृत व्यक्तींची नावे तसेच अनेक वर्षांपूर्वी स्थलांतर केलेल्या नागरिकांची नावे अद्याप कायम असल्याने निवडणूक प्रक्रियेवर उमेदवारांनी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे याबाबत उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली आहे