स्थानिक मुंगसाजी महाराज महाविद्यालयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०२५ च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत महाविद्यालयाची उज्वल परंपरा कायम राखली आहे. विविध पाच अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे.