दारव्हा: लोही शेत शिवारात मुरुमाचे अवैध उत्खनन,गुन्हा नोंद
रस्ते बांधकामासाठी मुरमाचे अवैध उत्खनन करणाऱ्या ईगल कंपनीच्या वाहनांवर तालुक्यातील लोही येथे तलाठ्याने कारवाई केली. यामध्ये वाहनांसह ४५ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लोही शेतशिवारात अवैध उत्खनन व वाहतूक सुरू होती, अशी तक्रार संतोष पंजाबराव चव्हाण यांनी दिली. त्यावरून सुशील साके व संगम यादव दोघे रा. मध्य प्रदेश यांच्या विरोधात दारव्हा पोलिसांनी कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता सहकलम ४८ (७), ४८ (८) कायद्यानुसार गुन्हा नोंदविला.