देवळाली प्रवरा नगरपालिका निवडणूक एकूण शांततेत सुरू असतानाच प्रभाग क्रमांक ७ मधील मतदान केंद्रावर वादग्रस्त प्रकार समोर आला आहे. काही मतदान प्रतिनिधींकडून जबरदस्तीने मतदारांकडून मतदान करून घेतले जात असल्याचा आरोप झाल्यानंतर या घटनेची माहिती घेण्यासाठी पत्रकार घटनास्थळी दाखल झाले.मात्र, पत्रकारांनी मतदान केंद्राच्या आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता तेथील पोलीस अधिकारी हमीद शेख कर्मचारी अजिनाथ चेमटे, होमगार्ड वप्रवीण दांगडे यांनी पञकांरनी आत जाण्यास मज्जाव केला.