कळवण तालुक्यातील कातळगाव शिवारात गट नंबर 118 मधील शिवाजी देवराम चव्हाण यांच्या गोठ्यात घुसून बिबट्याने चारशेळ्या ठार केले असून एक शेळी गंभीर जखमी केल्याची माहिती वनविभागाने दिली आहे रात्री अचानक बिबट्याने हल्ला केल्याने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे .