खैरी वलमाझरी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रम व सन्मान सोहळ्याचे आयोजन गुरुवार दि.8 जानेवारीला सकाळी 11 ते सायंकाळी सहा या वेळात करण्यात आले.पाटोदा ग्रामपंचायतचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील,पक्षीतज्ञ किरण पुरंदरे,आदर्श शिक्षक मुबारक सय्यद यांची यावेळी उपस्थिती होती.यावेळी आदर्श सरपंच पुरुषोत्तम रूखमोडे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व अधिकारींचा यावेळी सत्कार केला