रेल शिवारात वाळू उपसा थांबवण्यास सांगणाऱ्या पाच शेतकऱ्यांवर वाळूमाफियांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी १ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता घडली आहे. विहिरींची पाणीपातळी कमी होत असल्याचे सांगत वाळू उपसा करण्यास विरोध केल्याने, संतप्त झालेल्या १६ वाळूमाफियांनी शेतकऱ्यांना शिवीगाळ करत लोखंडी फावडे आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी शुक्रवारी २ जानेवारी दुपारी १ वाजता धरणगाव पोलिसांनी याप्रकरणी १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.