कळंब: बांगरवाडी शिवारात नुकसानग्रस्त भागाची आ कैलास पाटील यांनी केली पाहणी
कळंब तालुक्यातील बांगरवाडी येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमिनी अक्षरशः नदीचे पात्र धारण करून वाहताना दिसत आहेत. शेतकऱ्यांनी मेहनतीने पेरलेली पिके पाण्याखाली गेली असून जिल्हाभरात अशाच प्रकारचे दृश्य पाहावयास मिळत आहे. या आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. संपूर्ण हंगामाचे उत्पन्न पाण्यात गेले असून शेतकऱ्यांच्या कष्टाचे स्वप्न एका रात्रीत उद्ध्वस्त झाले आहे. असे मत आ कैलास पाटील यांनी या वेळी व्यक्त केले