वाघळी (प्रतिनिधी): सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाघळी नगरीत सालाबादप्रमाणे यावर्षीही यात्रोत्सव अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. भव्य कुस्ती दंगल आणि लोकनाट्य तमाशाच्या आयोजनाने यात्रेची रंगत वाढवली. या सर्व उपक्रमांचे शिस्तबद्ध नियोजन केल्याबद्दल ग्रामस्थांनी सरपंच पुत्र सोनूभाऊ पैलवान आणि ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले आहेत.