कन्नड: महिलांची सुरक्षा गंभीर; माजी आमदार जाधवांनी व्यक्त केली चिंता, नितीश कुमारांच्या ‘हिजाब’ मुद्द्यावरूनही टीका
महिलांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असल्याची चिंता आज दि २८ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केली आहे.देशात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत वाढ होत असून सरकारकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.यावेळी त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हिजाब ओढल्याच्या मुद्द्यावरूनही निशाणा साधला.सदरील व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.