सामायिक मालकीच्या ओलिताखालील शेतजमिनीत कोणतीही संमती न घेता बेकायदेशीररीत्या घरकुलाचे बांधकाम करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत एका भावाने आपल्या सख्या भावाविरोधात उपोषणास्त्र उगारले आहे. वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने, अखेर तहसील कार्यालय, आर्णी येथे सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे. आता प्रशासन चौकशी कुणाची करते व कोणत्या भावाला न्याय मिळवून देते हे पाहणे महत्त्वाचे. संजय उध्दवराव भोयर (रा. चिखली ईजारा ता. आणी) असे उपोषणकर्त्याचे नाव आहे. त्यांची शेतजमिन मौजा चिखली