भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त ऐंजल पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, श्री नरेंद्र सूर्यवंशी कॉलेज ऑफ फार्मसी आणि सुनिता नर्सिंग स्कूल, केळझर यांच्या वतीने स्त्री शिक्षण जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या निमित्ताने दिनांक ३ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता दहेगाव (गोसावी) येथे स्त्रीहक्क रॅली व पथनाट्याद्वारे ग्रामस्थांमध्ये स्त्री शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात आले.