राहुरी शहरात घरफोडी करून सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे चोरणाऱ्या दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरने अटक करून सुमारे ६ लाख ४६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी संत कृपा निवास, भुजाडी इस्टेट, मल्हारवाडी रोड, राहुरी येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व बँकेची कागदपत्रे चोरली होती.