पोलीस स्टेशन वेलतुर अंतर्गत येत असलेल्या जीवनापूर शिवारात चारा खात असतांना एका पाठोपाठ एक अशा एकूण 9 बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत चे वृत्त असे की भीमराव मूळेकर यांनी स्वतःची व इतर शेळीपालकांची शेळ्या चाराईसाठी जीवनापूर शिवारात नेल्या होत्या. चारा खात असतांना 9 बकऱ्यांचा अचानक मृत्यू झाला सदर घटनेत अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी व पोलीस स्टेशन वेलतुर येथे देण्यात आली.