समुद्रपूर: पट्टेदार वाघाची खापरी ( बर्फा ) शिवारात दहशत दोन जनावर केली ठार: पोथरा धरणाकडे वाघाची वाटचाल
गिरड परीसरातील त्या पट्टेदार वाघाची दहशत गेल्या नऊ दिवसापासून कायम असून खापरी (बर्फा ) शिवारात दोन जनावरावर हल्ला चढवून ठार केले . हि घटना १७ जुलै रोजी पहाटे ५ वाजता उघडकीस आली. त्यामुळे सावंगी, खापरी परीसरातील शेतशिवारात भीतीचे वातावरण आहे. या वाघाच्या मागावर वनविभागाचे ३ पथक कार्यान्वित आहे. वाघाच्या वास्तव्य परिसरात वनविभागाने कॅमेरे लावणे असून वाघाच्या हालचालीवर नजर ठेवली जात आहे.