पोलादपूर तालुक्यातील कोंडवी तळ्याची वाडी येथे अंतर्गत रस्ता तसेच भैरवनाथ–रवळनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या विकासकामांमुळे गावातील दळणवळण अधिक सुलभ होणार असून भाविक व ग्रामस्थांना मोठा लाभ होणार आहे. या वेळी कोंडवी विभागातील व पोलादपूर तालुक्यातील तसेच मुंबई–पुणे येथील चाकरमानी ग्रामस्थ, शिवसेना–युवासेनेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.