वर्ध्यातील दादाजी धुनीवाले यांच्या भक्तांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. वर्धा ते खंडवा या थेट रेल्वे सेवेसाठी खासदार अमर काळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला आता मोठे यश मिळताना दिसत आहे.खासदार काळे यांनी दिल्लीत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन भाविकांची अडचण मांडली, ज्यावर रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिले असल्याचे आज 18 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे