समुद्रपूर: वाघेडा ग्रामपंचायत येथील अपात्र झालेले तिन सदस्य व सरपंच अमोल मसराम पुन्हा पदावर विराजमान
समुद्रपुर तालुक्यातील वाघेडा येथील सरपंच अमोल मसराम व तिन सदस्य जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाने अपात्र झाले होते.यामुळे सरपंच अमोल मसरामसह तिन सदस्यांना पदावरून पायउतार व्हावे लागते होते.यावेळी सरपंच पदाचा कार्यभार उपसरपंच रविंद्र ठोंबरे यांच्याकडे तात्पुरता सुपूर्द करण्यात आला होता. यासंबंधी अपात्र सरपंच व सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाने विरोधात अप्पर आयुक्त नागपूर कार्यालयात याची दाखल केली होती.यावर अप्पर आयुक्त यांनी दिलेल्या आदेशात सरपंच अमोल मसरामसह तिन सदस्यांना पात्र ठरविले आहे.